Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

गुरुवार, १९ मे, २०२२

असा ही एक दिवस.....



🌹असाही एक दिवस🌹

दुःखाच्या वाटेवर असाही एक दिवस येतो. आणि तो माणसाला नवचैतन्य देऊन जातो.
असाच एक दिवस माझ्या जीवनात मुंबई गेट टुगेदर च्या रूपाने आला होता. दोन अडिज महिने अगदी तन, मन ,धन लाऊन आम्ही तो  कार्यक्रम कसा सर्वांना आनंद देऊन जाईल,आणि गोड आठवणी देईल या साठी झटत होतो...
माझ्या दोन मैत्रिणी अनघा आणि दीक्षा पायाला भिंगरी लाऊन पळत होत्या...माझा मात्र थोडाच हातभार होता... रंजुताई मोहन सर आपल्या परीने सर्वांना आमंत्रित करत होते...आणि आमची ओन्ली आयडिया कल्पना ग्रुप बनवून कसा छान कार्यक्रम होईल याचा आयडिया सांगत होती ..
पण खरी कसोटी होती ती आमची मुंबईकरांची अर्थात दीक्षा,अनघा मी आणि यश यांची...तरी ही न डगमगता तारेवरची कसरत करायला आम्ही सज्ज होतो...

नाही नाही म्हणता सभासदांचा आकडा तीस पार करून गेला आणि आमचा कामाचा वेग वाढला..नवीन हुरूप आला आणि जोमात काम चालू झालं...
सर्व तयारी पूर्ण झाली. बघता बघता 50वर आकडा गेला..

गेट-टुगेदर ला येणाऱ्या आमच्या मित्र मैत्रीणीना हि या भेटीची ओढ वाटू लागली.आणि गृपवर धुमाकूळ होऊ लागला.दोन दिवस आधी आमची धावपळ पाहण्यासारखी होती. 
 अनघाआणि दीक्षा नी अक्षरशः आपला जीव ओतला होता या कार्यक्रमात. स्टेशन वरून आणण्यापासून ते रूम मध्ये राहण्याची  खाण्याची सोय करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी पाहिल होत.दोन दिवस मुक्काम ठोकला होता अनघाने ठाण्यात.

अनेक संकटांना तोंड देत शेवटी तो दिवस उगवला.  पहिल्यांदाच भेटत असून ही जी आत्मीयता  प्रत्येकाच्या नजरे मधले प्रेम आणि जिव्हाळा पाहूनच समाधान वाटले.
सर्वांचे ते एकमेकांना भेटणे फोटो काढणे तसेच सुंदर सुंदर कविता, शायऱ्या सादर करणे आपल्या गुरूचे भरभरून कौतुक करणे आणि प्रतिलिपी वरच्या आठवणी सांगणे .गप्पा ,स्पर्धा यात तो दिवस खूपच मस्त गेला.

कार्यक्रम खूप सुंदर आणि आठवणीत राहील असा साजरा झाला. आणि प्रत्येकाला सुखद आठवणी  देऊन गेला..

खरच ..स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एक दिवस असाही येईल जो आपल्याला आयुष्यभराचा आनंद देऊन जाईल...😍🥳🙏
         मानसी आंब्रे🌹

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

हळव मन.,(. लेख)




हळव मन

माणसाच्या मनाच्या तऱ्हा काही वेगळ्याच असतात...
कधी ते क्रूर असतं ,कधी खूप समजदारी ने वागतं ,कधी हळव असतं, तर कधी ते वाऱ्यासारख धावत.... 
एखाद्या गरीब थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या व्यक्तीला बघून कधी त्याला त्याची दया येते. काहीतरी त्याला मदत करावी म्हणून निदान घरातून एखादी चादर आणून तरी तो त्या व्यक्तीच्या अंगावर ओढतो...
कधी एखाद्या गरीब व्यक्तीला , लहान मुलाला रस्त्यावर भुकेसाठी रडताना बघून त्याचं हळव मन त्याला काहीतरी खायला देण्याची इच्छा प्रकट करत...
कधी कधी एखाद्या म्हाताऱ्या आजी-आजोबांना भीक मागताना बघून त्याचं मन गहिवरून येतं... का टाकत असतील लोक आपल्या आई बापाला हा विचार त्याच्या मनात येतो... आणि नकळत तो त्यांना काहीतरी मदत करण्यासाठी पुढे सरसावतो...
कारण त्याच्यामध्ये असलेली माणुसकी हे त्याला सर्व करण्यास भाग पाडते.

 त्याच हळवं मन गहिवरून येतं त्या गरीब लाचार लोकांना बघून त्यांचे दुःख थोडं का होईना कमी करण्यासाठी पुढे सरसावतो त्याचा मदतीचा हात...
कधी कधी तो दानधर्म करून नामानिराळा राहतो. आपणही समाजाचा एक हिस्सा आहोत आणि या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून तो नेहमीच पुढे सरसावतो. 
एखाद्या आपत्तीत सर्वांना मदत करायला धावतो.
कारण प्रत्येक वेळी तो त्याच्या हळव्या मनाच ऐकतो....
            मानसी आंब्रे 🌹