🌹असाही एक दिवस🌹
दुःखाच्या वाटेवर असाही एक दिवस येतो. आणि तो माणसाला नवचैतन्य देऊन जातो.
असाच एक दिवस माझ्या जीवनात मुंबई गेट टुगेदर च्या रूपाने आला होता. दोन अडिज महिने अगदी तन, मन ,धन लाऊन आम्ही तो कार्यक्रम कसा सर्वांना आनंद देऊन जाईल,आणि गोड आठवणी देईल या साठी झटत होतो...
माझ्या दोन मैत्रिणी अनघा आणि दीक्षा पायाला भिंगरी लाऊन पळत होत्या...माझा मात्र थोडाच हातभार होता... रंजुताई मोहन सर आपल्या परीने सर्वांना आमंत्रित करत होते...आणि आमची ओन्ली आयडिया कल्पना ग्रुप बनवून कसा छान कार्यक्रम होईल याचा आयडिया सांगत होती ..
पण खरी कसोटी होती ती आमची मुंबईकरांची अर्थात दीक्षा,अनघा मी आणि यश यांची...तरी ही न डगमगता तारेवरची कसरत करायला आम्ही सज्ज होतो...
नाही नाही म्हणता सभासदांचा आकडा तीस पार करून गेला आणि आमचा कामाचा वेग वाढला..नवीन हुरूप आला आणि जोमात काम चालू झालं...
सर्व तयारी पूर्ण झाली. बघता बघता 50वर आकडा गेला..
गेट-टुगेदर ला येणाऱ्या आमच्या मित्र मैत्रीणीना हि या भेटीची ओढ वाटू लागली.आणि गृपवर धुमाकूळ होऊ लागला.दोन दिवस आधी आमची धावपळ पाहण्यासारखी होती.
अनघाआणि दीक्षा नी अक्षरशः आपला जीव ओतला होता या कार्यक्रमात. स्टेशन वरून आणण्यापासून ते रूम मध्ये राहण्याची खाण्याची सोय करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी पाहिल होत.दोन दिवस मुक्काम ठोकला होता अनघाने ठाण्यात.
अनेक संकटांना तोंड देत शेवटी तो दिवस उगवला. पहिल्यांदाच भेटत असून ही जी आत्मीयता प्रत्येकाच्या नजरे मधले प्रेम आणि जिव्हाळा पाहूनच समाधान वाटले.
सर्वांचे ते एकमेकांना भेटणे फोटो काढणे तसेच सुंदर सुंदर कविता, शायऱ्या सादर करणे आपल्या गुरूचे भरभरून कौतुक करणे आणि प्रतिलिपी वरच्या आठवणी सांगणे .गप्पा ,स्पर्धा यात तो दिवस खूपच मस्त गेला.
कार्यक्रम खूप सुंदर आणि आठवणीत राहील असा साजरा झाला. आणि प्रत्येकाला सुखद आठवणी देऊन गेला..
खरच ..स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एक दिवस असाही येईल जो आपल्याला आयुष्यभराचा आनंद देऊन जाईल...😍🥳🙏
मानसी आंब्रे🌹
अप्रतिम सुंदर मानसीमॅम
उत्तर द्याहटवाकिती सुंदर सजीव वर्णन केलास.खूप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदीच असा दिवस विसरणे अशक्य आहे....खूप खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्यासाठी खरचं तुमचे सर्वांचे कौतुक आहे...आणि खूप छान वाटलं आपल्या मुंबईकरांनी सर्व अडचणीला तोंड देऊन कार्यक्रम यशस्वी केला.. त्यासाठी अभिनंदन.... माझीही इच्छा होती कार्यक्रमाला येण्याची पण घरगुती अडचणी मुळे इतक्या जवळअसूनही येऊ शकलो नाही... त्यासाठी सर्वांची माफी मागतो...पण what's app वर फोटो व्हिडिओ पाहून तिथे असल्या सारखं जाणवलं...पण तिथे येऊन कार्यक्रमात सहभागी होण्याची मजा वेगळीच असणार हे नक्की..पण असो next time नक्की हजर असेन.... पुन्हा एकदा कार्यक्रम छान केलात खूप मेहनत घेतली त्यासाठी मनापासून सर्व Admin che अभिनंदन...आणि खूप छान लेख लिहिला आठवणी वर अप्रतिम👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद आपले
हटवा