आठवणीत तुझ्या गुंतताना...
भावनांचा खेळ हा सारा
तुझ्यासह खेळताना...
माझी मी हि रहात नाही
मन नसतं थाऱ्यावर...
स्वप्न घेऊन मुठीत माझ्या
शोधते त्याला वाऱ्यावर.....
झुळूक आहे वाऱ्याची तो
हाती कधी लागणार नाही...
मन माझे बेचैन उदास
त्याचे तर काहीच जाणार नाही..
भटकत राहीन त्याच्या शोधात मी
त्याला काहीच कळणार नाही....
निरव शांतता मन ही शांत
वादळ कधीच शमणार नाही...
मानसी🌹
खुपच सुंदर.... 👌👌
उत्तर द्याहटवासुंदर लेखन 👌👍👌
उत्तर द्याहटवाखुपच छान रचना केलीयस 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाव्वाऽ..!
उत्तर द्याहटवाअप्रतिम...!👌
खूप छान ....!!👌👌
आबा
🌹