Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

आठवणी...

राहू दे ना मला
 त्या आठवणींच्या जगात..
भावना नसतात तिथे
 त्याच स्वप्नांच्या जगात..
मुक्तपणे वावरू दे 
मनासारखे जगु दे...
ना कसल्या बेड्या
ना कसली खंत
स्वैर उडताना आकाशी 
पायात ना कसले बंध...
 स्वप्न माझी सर्व
 सत्यात उतरू देत...
मला माझ्या आठवणीत
भावनाविवश होऊ देत...
                     मानसी🌹
                   

२२ टिप्पण्या:

  1. खूपच भावनिक शब्द आहे खूपच विरहित भावना मांडल्या आहेत शेवटच्या ओळी खुपच सुंदर लिहिल्या आहे

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments