Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

आठवणींचे काहूर...

रोज तूझी आठवण येते
 मनात माझ्या काहूर माजते...
विरहात तुझ्या प्रत्येक क्षणाने
मन हे माझे आतुर होते...
नसते भान जगाचे
एकटीच मी तुझ्यात असते...
गोड गुपित आपल्या मधले आठवून 
गालावर हळूच लाली  फुलते...
दूर होईल आता दुरावा
स्वतःशीच मी गुंज हे करते...
येशील अवचित पाठीमागून
विचार करुन हे मन शहारते...
                              मानसी🌹

२१ टिप्पण्या:

  1. खरच खूपच सुंदर निरागस भाव व्यक्त केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मनातील भाव खुपचं सुंदर रेखाटले आहे. अप्रतिम रचना रचलीय.👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments