Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

मुलगी....

मुलगी असणे गुन्हा कसला 
मुलगी असणे भाग्य आहे...
मुलगी नसणाऱ्या आई बापाला वाटतं 
सर्वात मोठे दुर्भाग्य आहे...
मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे 
हसत-खेळत ठेवते घर
सासरी ती जाताना मात्र ठेवावा लागतो
 बापाला स्वतःच्या हृदयावर दगड..
दोन घरांना जोडते 
सर्वांची मने सांभाळते..
अनेक नात्यांची कर्तव्य बजावते..
 मुलगीच असते ना ती कोणाची तरी
जी कधी काली तर कधी मर्दानी बनते... 
प्रत्येकाला समजून घेते 
कधी वात्सल्य तर कधी प्रेम जपते...
                                     मानसी🌹

२१ टिप्पण्या:

  1. मानसी जीऽ..!!
    खूपच छान.👌👌👌👌👌
    कंन्या ही कंन्या असते ..!
    आई बापाची लाडकी सुकन्याच असते...!
    सक्षात दुर्गामाता असते घराचे घरपणच असते...!
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिमच ..रचना..खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खरी गोष्ट आहे. ज्यांना मुली आहेत. ते भाग्यवान म्हटल पाहीजेत. छान आहे रचना 👌👌👌👌👌💐💐💐

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments