सावित्रीच्या लेकी आम्ही
शिकून सवरून मोठ्या झालो...
बालविवाह ,केशवपन
या सगळ्यात मुक्त झालो..
पुरुषांच्या बरोबरीने
समाजात या उभ्या ठाकलो...
स्वप्न उद्याचे सजवून
चंद्रावर ही जाऊन आलो..
जपून ठेवा वसा तिचा
अनेक पदव्या मिळवून घ्या...
सावित्रीच्या लेकी आम्ही
जगाला या दाखवून द्या..
मानसी आंब्रे
खरं आहे सावित्रीबाई फुले यांनी स्वतः त्रास सहन करून स्त्री वर्गाला त्यांच्या मान मिळवून दिला, अप्रतिमच रचना केलीयस 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर लिहिलंय मॅडम! जिद्द व आत्मविश्वास पेरणारे काव्य!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा