Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

एक कृष्ण..

एक कृष्ण आयुष्यात आपल्या
जिवाभावाचा सखा पाहिजे...
नसला तो जवळ जरी
मनाला चुटपुट लावणारा पाहिजे..
क्या हुकूम मेरे आका म्हणत
आपल्याला उपयोगी पडणारा पाहिजे...
संकटाचे ओझे डोक्यावर असताना
भार हलका करणारा पाहिजे ..
एक मित्र सुदाम्या सारखा
 जीवाला जीव देणारा पाहिजे. .
कधी कधी कर्ण होऊन
 मैत्री साठी जागणारा पाहिजे...
एक मित्र तुझ्यासारखा 
 मोकळ्या मनाने बोलणारा पाहिजे...
                                    मानसी,,🌹

१० टिप्पण्या:

  1. क्या बात है..! 👌
    खरंय..!
    जीवाला जीव देणारा मित्र हवाच.!
    सुखदुःखाच्या समयी साथ देणारा हवाच.!
    अप्रतिम कविता सुंदर रचना..👌
    🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खरंय ताई आपल्या जीवनात जीवाला जीव देणारा एकतरी मित्र हवाच
    सुंदर लेखन केले ✍️👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments