Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

नाण्याच्या दोन बाजू

लग्नाच्या आधीच जीवन माझं 
नाण्याची पहिली बाजू  होत..
आपल्या मस्तीत बागडणाऱ्
 निरागस एक फुलपाखरू होत..
कशाचीही फिकीर नव्हती
उद्याची चिंता नव्हती...
तरंग होता पाण्यावरचा
 खळखळणारी नदी होती...
ना कुणाचा द्वेष होता
 ना कोणाचा मत्सर होता..
निरागस त्या कळीला
 फक्त भावनांचा आदर होता...             
              दिवस सरले मोठेपण आले 
             कळीचे फुलात रूपांतर झाले..
             स्वप्नांच्या तिच्या चुरगळा झाला
            भावना मनीच्या विरून गेल्या..
             जबाबदारीच्या ओझ्याखाली 
             आता त्याही मरून गेल्या. 
              प्रत्येक नातं निभावताना मागच्या
              नात्यांना विराम आला...
              संकटाच्या ओझ्याखाली 
            आशा आकांक्षा मरून गेल्या..
            अर्ध आयुष्य निघून गेल्यावर मात्र
            कुठेतरी आशेचा किरण दिसला...
           जीवनात माझ्या कवितांच्या साथीने 
            पुन्हा नवीन बहर फुटला....


५ टिप्पण्या:

  1. व्वाऽ...!
    खूपच छान शब्द आणि भावना व्यक्त केल्या.
    पण..मौल्यवान जीवन फक्त स्वतःचेच असते; ते तर कोणाच्याही भरोसावर ठेवायचे नसते. शेवटपर्यंत परमेश्र्वराच्या कृपा छायेत राहून आपल्या कामात आपण व्यस्त रहायच असतं..!!
    आणि सगळ्यात जास्त आपणच आनंदाने रहायचं असतं.
    पण..खूपच छान लिखाण केलं आहे.
    खूप खूप शुभेच्छा..!
    💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐
    आबा

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लिखाण केलंस दि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली एक वास्तविकता दर्शविली 👍👍👍👌👌👌👌✍️✍️✍️🙏🙏🌹🌹🌹💞💞💞🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान रचना केलीयस 👌🏼👌🏼⭐⭐⭐⭐
    रोजच्या रटाळ आयुष्यात आपल्या
    सर्वांना मिळालेला कवितांचा
    परिसस्पर्श लाखमोलाचा आहे

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments