Welcome : to "Mansi"
Welcome : to "Mansi"
शुक्रवार, ३ जून, २०२२
कटू सत्य...
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
३:४५:०० PM
५ टिप्पण्या:
गुरुवार, १९ मे, २०२२
असा ही एक दिवस.....
🌹असाही एक दिवस🌹
दुःखाच्या वाटेवर असाही एक दिवस येतो. आणि तो माणसाला नवचैतन्य देऊन जातो.
असाच एक दिवस माझ्या जीवनात मुंबई गेट टुगेदर च्या रूपाने आला होता. दोन अडिज महिने अगदी तन, मन ,धन लाऊन आम्ही तो कार्यक्रम कसा सर्वांना आनंद देऊन जाईल,आणि गोड आठवणी देईल या साठी झटत होतो...
माझ्या दोन मैत्रिणी अनघा आणि दीक्षा पायाला भिंगरी लाऊन पळत होत्या...माझा मात्र थोडाच हातभार होता... रंजुताई मोहन सर आपल्या परीने सर्वांना आमंत्रित करत होते...आणि आमची ओन्ली आयडिया कल्पना ग्रुप बनवून कसा छान कार्यक्रम होईल याचा आयडिया सांगत होती ..
पण खरी कसोटी होती ती आमची मुंबईकरांची अर्थात दीक्षा,अनघा मी आणि यश यांची...तरी ही न डगमगता तारेवरची कसरत करायला आम्ही सज्ज होतो...
नाही नाही म्हणता सभासदांचा आकडा तीस पार करून गेला आणि आमचा कामाचा वेग वाढला..नवीन हुरूप आला आणि जोमात काम चालू झालं...
सर्व तयारी पूर्ण झाली. बघता बघता 50वर आकडा गेला..
गेट-टुगेदर ला येणाऱ्या आमच्या मित्र मैत्रीणीना हि या भेटीची ओढ वाटू लागली.आणि गृपवर धुमाकूळ होऊ लागला.दोन दिवस आधी आमची धावपळ पाहण्यासारखी होती.
अनघाआणि दीक्षा नी अक्षरशः आपला जीव ओतला होता या कार्यक्रमात. स्टेशन वरून आणण्यापासून ते रूम मध्ये राहण्याची खाण्याची सोय करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी पाहिल होत.दोन दिवस मुक्काम ठोकला होता अनघाने ठाण्यात.
अनेक संकटांना तोंड देत शेवटी तो दिवस उगवला. पहिल्यांदाच भेटत असून ही जी आत्मीयता प्रत्येकाच्या नजरे मधले प्रेम आणि जिव्हाळा पाहूनच समाधान वाटले.
सर्वांचे ते एकमेकांना भेटणे फोटो काढणे तसेच सुंदर सुंदर कविता, शायऱ्या सादर करणे आपल्या गुरूचे भरभरून कौतुक करणे आणि प्रतिलिपी वरच्या आठवणी सांगणे .गप्पा ,स्पर्धा यात तो दिवस खूपच मस्त गेला.
कार्यक्रम खूप सुंदर आणि आठवणीत राहील असा साजरा झाला. आणि प्रत्येकाला सुखद आठवणी देऊन गेला..
खरच ..स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एक दिवस असाही येईल जो आपल्याला आयुष्यभराचा आनंद देऊन जाईल...😍🥳🙏
मानसी आंब्रे🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
४:१६:०० PM
४ टिप्पण्या:
गुरुवार, ७ एप्रिल, २०२२
हळव मन.,(. लेख)
हळव मन
माणसाच्या मनाच्या तऱ्हा काही वेगळ्याच असतात...
कधी ते क्रूर असतं ,कधी खूप समजदारी ने वागतं ,कधी हळव असतं, तर कधी ते वाऱ्यासारख धावत....
एखाद्या गरीब थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या व्यक्तीला बघून कधी त्याला त्याची दया येते. काहीतरी त्याला मदत करावी म्हणून निदान घरातून एखादी चादर आणून तरी तो त्या व्यक्तीच्या अंगावर ओढतो...
कधी एखाद्या गरीब व्यक्तीला , लहान मुलाला रस्त्यावर भुकेसाठी रडताना बघून त्याचं हळव मन त्याला काहीतरी खायला देण्याची इच्छा प्रकट करत...
कधी कधी एखाद्या म्हाताऱ्या आजी-आजोबांना भीक मागताना बघून त्याचं मन गहिवरून येतं... का टाकत असतील लोक आपल्या आई बापाला हा विचार त्याच्या मनात येतो... आणि नकळत तो त्यांना काहीतरी मदत करण्यासाठी पुढे सरसावतो...
कारण त्याच्यामध्ये असलेली माणुसकी हे त्याला सर्व करण्यास भाग पाडते.
त्याच हळवं मन गहिवरून येतं त्या गरीब लाचार लोकांना बघून त्यांचे दुःख थोडं का होईना कमी करण्यासाठी पुढे सरसावतो त्याचा मदतीचा हात...
कधी कधी तो दानधर्म करून नामानिराळा राहतो. आपणही समाजाचा एक हिस्सा आहोत आणि या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून तो नेहमीच पुढे सरसावतो.
एखाद्या आपत्तीत सर्वांना मदत करायला धावतो.
कारण प्रत्येक वेळी तो त्याच्या हळव्या मनाच ऐकतो....
मानसी आंब्रे 🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
६:०४:०० PM
1 टिप्पणी:
सोमवार, २८ मार्च, २०२२
बाप...
आईच्या उदरातूबाहेर येताना आपण
कळेची झळ त्यालाही लागते..
तो बाप असला म्हणून काय
हृदय तेव्हा त्याचे ही फाटते...
गरीब असला तरी
हातानं खेळणं तो घडवतो...
श्रीमंत बाप पोरासाठी
वयाच्या आधीच खेळणं उभ करतो...
अडाणी बाप स्वतः अर्धपोटी राहतो
पण पोरांनी शिकाव म्हणून
मोलमजुरी करून
रक्त आपल आटवतो...
आजारी पडलो आपण की
जीव त्याचाही तळमळत असतो
रात्रभर येरझाऱ्या मारत
तो ही जगात बसतो ...
ठिगळ लावून स्वतः फिरतो
पण पोराला नवा सदरा आणतो..
गाडीत नाही बसवता आल
तरी खांद्यावरून पोराला शाळेत न्हेतो...
कठोर कधी बोलला तरी
पोटात माया धरून असतो..
झोपलेल्या पोराला न्याहाळताना
डोळ्यातलं पाणी सांडत बसतो...
शिक्षण ,कॉलेज झाल्यावरही
नोकरीसाठी मागे लागतो..
भविष्य घडावे तुमचे
एवढाच त्याचा स्वार्थ असतो....
नका दूर करू त्याला
खरा आधार तोच असतो..
कितीही कठोर असला तरी
बाप हा शेवटी बाप असतो...
मानसी आंब्रे 🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
३:५०:०० PM
२ टिप्पण्या:
शुक्रवार, २५ मार्च, २०२२
आज हि तू....
प्रेमळ असा स्वभाव तुझा
मला घायाळ करत होता
तुझ्या रूपाच्या चांदण्यात
जीव माझा हरवत होता..
आजही तू असशील का तशी
परीसरखी बागडणारी
गुपचूप काळ काढून
कान हाताने पकडणारी..
आज हि तु तशीच
खट्याळपणा करशील का
समजून मला अनोळखी
दुरूनच बघून पळशील का...
...................मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
४:०५:०० PM
1 टिप्पणी:
गुरुवार, २४ मार्च, २०२२
प्रेम...
प्रेम📥लघुकथा
स्तिच्यावर निस्वार्थीपणे एकतर्फी प्रेम करणारा तो... आज नऊ वर्ष झाली तरी तिच्या होकाराची वाट बघत होता. तिलाही ठाऊक होतं की त्याच्या एवढ तिच्यावर कोणीही प्रेम करणार नाही... पण जातीच्या बंधनामुळे ती त्याला नकार देत होती . तरीही तो तिला वेळोवेळी मदत करत असे, जपत असे...
आज अपघातामुळे हॉस्पिटलच्या खाटेवर ती निपचित पडली असता तिच्या कानावर शब्द आले "घाबरू नकोस मी आहे तुझ्याबरोबर आजही" नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
तिच्या मनात विचार आला ज्या व्यक्तीला आजपर्यंत आपण नाकारले ती व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे. मग का विचार करायचा समाजाचा आज तो समाज आहे का माझ्याबरोबर ???..
भरल्या डोळ्याने तिने आपला हात त्याच्या हातात दिला
आणि आयुष्यभर कधीही तुझा हात मी सोडणार नाही असं वचन तिने त्याला दिले . समाजाची
जातीची बंधने तोडून आज ते दोन जीव एकत्र आले होते.
फक्त आणि फक्त एकमेकांच्या मनातल्या निस्सीम प्रेमा पोटी....
🌹 मानसी आंब्रे
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
६:२७:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
रविवार, २० मार्च, २०२२
व्यसन....
व्यसन करा भक्तीचे
नामात त्याच्या तल्लीन व्हा...
तुझ माझ सोडून द्या रे
जीवन आपल सार्थकी न्ह्या...
व्यसन तुझ जडल मला
कसा तुला समजावू...
समजून घे ना प्रितीच्या फुला
जवळ येना दूर नको जाऊ...
जीवाला जीव देणारी माणसे
मनात घर करतात ..
व्यसन लागले मैत्रीचे तर
आयुष्यभर निभवतात...
मानसी आंब्रे 🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
११:१५:०० AM
४ टिप्पण्या:
सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२
मराठी आहे बोली माझी अभिमानाने सांगतो मी... जपतो हृदयी माय मराठीमुखी तिलाच वदतो मी.. अनेक संथ सांगून गेले मराठीचे सुंदर गोडवे.. . आजही अभंग,ग्रंथ रुपी मना मनात जपले सारे.. .महती सांगून मराठीची लेकरांना बोलण्या भाग पाढू ... इतिहास शिवबाचा सांगून,भारुड अभंग,भजन अन् पोवाडा दाखवून मराठीची महती वाढवू ... मनी वसलेली माय मराठी घरा घरात अशीच राहो.. परकीय भाषा शिक्षणात परीमुलांच्या मनात मराठीचा अभिमान राहो... मानसी 🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
११:५६:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२
आभासाची दुनिया...
आभासाच्या या जगात
भास सर्वांनाच होतात...
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधताना
मनाला यातना होतात...
कितीही संभाळले स्वतःला तरी
चुका हातून होतात....
उत्तर मात्र मिळत नाही
भावना मरून जातात...
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
१०:४८:०० PM
३ टिप्पण्या:
सोमवार, ३ जानेवारी, २०२२
सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी आम्ही
शिकून सवरून मोठ्या झालो...
बालविवाह ,केशवपन
या सगळ्यात मुक्त झालो..
पुरुषांच्या बरोबरीने
समाजात या उभ्या ठाकलो...
स्वप्न उद्याचे सजवून
चंद्रावर ही जाऊन आलो..
जपून ठेवा वसा तिचा
अनेक पदव्या मिळवून घ्या...
सावित्रीच्या लेकी आम्ही
जगाला या दाखवून द्या..
मानसी आंब्रे
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
११:५७:०० AM
२ टिप्पण्या:
बुधवार, २९ डिसेंबर, २०२१
आठवणीत त्याच्या...
विसर पडतो माझा मला
आठवणीत तुझ्या गुंतताना...
भावनांचा खेळ हा सारा
तुझ्यासह खेळताना...
माझी मी हि रहात नाही
मन नसतं थाऱ्यावर...
स्वप्न घेऊन मुठीत माझ्या
शोधते त्याला वाऱ्यावर.....
झुळूक आहे वाऱ्याची तो
हाती कधी लागणार नाही...
मन माझे बेचैन उदास
त्याचे तर काहीच जाणार नाही..
भटकत राहीन त्याच्या शोधात मी
त्याला काहीच कळणार नाही....
निरव शांतता मन ही शांत
वादळ कधीच शमणार नाही...
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
६:१४:०० PM
४ टिप्पण्या:
मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१
असेच काही घडू दे...
मनामध्ये माझ्या सखे
तुझ्या प्रेमाचा ठाव लागू दे...
हातावरच्या मेहंदीला तुझ्या
माझ्या हृदयाचा रंग चढू दे...
सहज अंगणात फिरताना
पारिजातकाचां सडा पडूदे...
अंगा अंगात तुझ्या
माझ्या प्रितिचां सुगंध दरवळू दे...
आरशात पाहताना मला आठवून
गाली तुझ्या खळी पडू दे..
लाजेने तुला चुर बघताना
दोघांच्या ही मनात कळी फुलू दे...
नजर ना लागो प्रेमाला आपल्या
रोज नव्याने प्रेम बहरू दे ..
तुझ्यात मी अन् माझ्यात तू
जीवनात सदा सुख लाभू दे
...... मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
१२:१२:०० PM
८ टिप्पण्या:
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१
नाण्याच्या दोन बाजू
लग्नाच्या आधीच जीवन माझं
नाण्याची पहिली बाजू होत..
आपल्या मस्तीत बागडणाऱ्
निरागस एक फुलपाखरू होत..
कशाचीही फिकीर नव्हती
उद्याची चिंता नव्हती...
तरंग होता पाण्यावरचा
खळखळणारी नदी होती...
ना कुणाचा द्वेष होता
ना कोणाचा मत्सर होता..
निरागस त्या कळीला
फक्त भावनांचा आदर होता...
दिवस सरले मोठेपण आले
कळीचे फुलात रूपांतर झाले..
स्वप्नांच्या तिच्या चुरगळा झाला
भावना मनीच्या विरून गेल्या..
जबाबदारीच्या ओझ्याखाली
आता त्याही मरून गेल्या.
प्रत्येक नातं निभावताना मागच्या
नात्यांना विराम आला...
संकटाच्या ओझ्याखाली
आशा आकांक्षा मरून गेल्या..
अर्ध आयुष्य निघून गेल्यावर मात्र
कुठेतरी आशेचा किरण दिसला...
जीवनात माझ्या कवितांच्या साथीने
पुन्हा नवीन बहर फुटला....
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
६:१४:०० PM
५ टिप्पण्या:
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१
एक कृष्ण..
एक कृष्ण आयुष्यात आपल्या
जिवाभावाचा सखा पाहिजे...
नसला तो जवळ जरी
मनाला चुटपुट लावणारा पाहिजे..
क्या हुकूम मेरे आका म्हणत
आपल्याला उपयोगी पडणारा पाहिजे...
संकटाचे ओझे डोक्यावर असताना
भार हलका करणारा पाहिजे ..
एक मित्र सुदाम्या सारखा
जीवाला जीव देणारा पाहिजे. .
कधी कधी कर्ण होऊन
मैत्री साठी जागणारा पाहिजे...
एक मित्र तुझ्यासारखा
मोकळ्या मनाने बोलणारा पाहिजे...
मानसी,,🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
१२:२२:०० AM
१० टिप्पण्या:
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
नुसत्या तुझ्या असण्याने.....
🌹🌸🌹🌸🌹🌸🌸❤️🌸🌸🌹🌸🌹🌸🌹
मन माझे मोहरते ..
स्वप्नांच्या दुनियेत वावरल्या सारखे
तुझ्या अवतीभवती ते फिरते...
नसते आस तुला भेटण्याची तरी
तुझ्यावरच प्रेमाचा वर्षाव करते...
किती अबोल प्रीत ही माझी
रात्रंदिवस फक्त तुलाच स्मरते...
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
२:५२:०० PM
११ टिप्पण्या:
खूप वाटतंय....
खूप वाटतंय कोणी तरी जवळ घ्यावे
हृदयाशी त्याच्या बिलगून धुंद होऊन जावे..
खूप वाटत जिवाभावाचा सखा
कधी तरी येईल आणि घेईल मला कवेत
म्हणेल आहे ना मी राणी तुझ्या समवेत..
हातात हात घेउन क्षण सुखाचे जगताना
आठवणी राहतील सुखाच्या तू जवळ असताना..
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
१०:०२:०० AM
८ टिप्पण्या:
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१
आठवण..
मी हि नसते माझी जेव्हा
आठवण तुझी येते..
शब्द हे माझे प्रतिबिंब
अन् तुझी साथ आठवते..
घेऊन हाती हात माझा
नजरेची भाषा उलघडते...
हळूच कळी फुलते गाली
लाजेने मी चुर होते ..
लवकर ये ना वाट पाहुनी
सख्या मी थकून जाते..
अवघडलेल्या माझ्या मनाला
समजाऊन मी पुन्हा तुला आठवते...
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
१२:५१:०० AM
५ टिप्पण्या:
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१
मागे वळून बघताना
आप आपल्या जीवनाच्या ...
मागे वळून बघताना
फक्त पाऊल खुणाच उरतात...
आठवणींच्या त्या जगातून
निसटतात मोहाचे क्षण
मागे फक्त अश्रूंचे थेंबच उरतात....
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
५:४१:०० PM
१२ टिप्पण्या:
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१
रासरंग.....
व्याकुळ झाली हि राधा
पाहण्या शाम सावळा...
रास खेळण्या मन हे रमेना
शोधी टिपूर चांदण्यात...
नजर भिरभिरे
मन हि हरले
आता उरली न कसली आस..
होई बावरी राधा
पाहण्या श्री कृष्णास....
गुपचूप येऊन पाठी मागून
छेडी कृष्ण सखा तो..
बघुन गाली खुलली लाली
हरवून गेली ती कृष्णात...
रास रंगात श्रीरंग तो
राधा राधा जप करे
बेधुंद ते दोघे होता
खेळाला ही रंग चढे......
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
४:२६:०० PM
१३ टिप्पण्या:
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१
खिडकीतला चंद्र ...
🌜खिडकीतला चंद्र त्यालाही दिसतो
खिडकीतला चंद्र मलाही दिसतो...🌜
बघून मला गालातल्या गालात
🌛खूप सुंदर तो हसतो...
लपवतो सारे भाव मनातले
तरी तो मला जवळचा भासतो...🌜
माझ्याही नकळत मला पाहताना
🌛प्रेमाचे गुपित सांगून जातो....
मानसी🌹
Posted by: Kavya-pushpa-kavi-aaba Commets here-
Kavyapushpa-kavyatri-Manasi
येथे
११:३४:०० AM
९ टिप्पण्या:
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)